आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
संगीतमय पु.ल.
गायक पु.ल.
संगीतकार पु.ल.
हार्मोनियमवादक पु.ल.
चित्रपट माध्यमात काम करत असतानांच पु.लं.नी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले. 'मोठी माणसे, मानाचं पान, देवबाप्पा, दूधभात' अशा बऱ्याच चित्रपटांना त्यांचे संगीत होते. 'गुळाचा गणपती' तर आपण 'सबकुछ पु. ल.' म्हणूनच ओळखतो. पु.लं.नी संगीत दिलेलं एक अजरामर गीत म्हणजे 'नाच रे मोरा'. साधी, सोपी आणि गोड चाल! यामुळेच ते गाणं घराघरात पोहोचलं. आजही ऐकताना ते तितकंच टवटवीत वाटतं! 'शब्दावाचून कळले सारे', 'माझे जीवन गाणे', 'हसले मनी चांदणे' या सारखी कित्येक गाणी आहेत, ज्यांना पु.लं.चं संगीत आहे हे बऱ्याच जणांना माहित नाही.

या कॅसेटमध्ये पुलंच्या आवाजात खालील गाणी ऐकायला मिळतात:
तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं(१९७१)
गायिका- माणिक वर्मा

ही कुणी छेडली तार- चित्रपट 'गुळाचा गणपती'(१९५३)
गायक- आशा भोसले, वसंतराव देशपांडे

झाली पहाट(१९५१)
गायिका- जोत्स्ना भोळे

सुवर्ण द्वारावतीचा राणा- चित्रपट 'गुळाचा गणपती'(१९५३)
गायिका- माणिक वर्मा

सख्यांनो करु देत शृंगार- चित्रपट 'देवबाप्पा'(१९५३)
गायिका- आशा भोसले

इंद्रायणी काठी- चित्रपट 'गुळाचा गणपती'(१९५३)
गायक- भीमसेन जोशी

शब्दावाचून कळले सारे(१९६९)
गायक- जितेंद्र अभिषेकी

नाच रे मोरा- चित्रपट 'देवबाप्पा'(१९५३)
गायिका- आशा भोसले

इथेचा टाका तंबू- चित्रपट 'गुळाचा गणपती'(१९५३)
गायक- आशा भोसले, वसंतराव देशपांडे

शाम घुंगट पट खोले- चित्रपट 'गुळाचा गणपती'(१९५३)
गायिका- माणिक वर्मा

केतकीच्या बनात- चित्रपट 'गुळाचा गणपती'(१९५३)
गायिका- आशा भोसले

हसले मनी चांदणे(१९५१)
गायिका- माणिक वर्मा

माझे जीवन गाणे(१९६९)
गायक- जितेंद्र अभिषेकी


अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित