आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
संगीतमय पु.ल.
गायक पु.ल.
संगीतकार पु.ल.
हार्मोनियमवादक पु.ल.

वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि सुधीर फडके 'अवघाचि संसार' गात आहेत. पेटीच्या साथीला पु. ल. आणि तबल्यावर केशव नावेलकर.
संगीत हे पु. लं.चे सर्वात पहिले प्रेम होते. साहित्य, सिनेमा, रंगभूमी या बरोबरच संगीत क्षेत्रालाही त्यांच्या
बहुरुपी प्रतिभेचा परिसस्पर्श झालाच होता! गायक, हार्मोनियम वादक, संगीतकार म्हणून त्यांनी केलेलं काम त्यांच्या एकूण साहित्यिक कामगिरीच्या मानाने कमी असलं तरी त्यालाही एक वेगळा 'पु. ल.'टच होताच!
प्रत्येक कलाकृतीत नावीन्य होते, म्हणूनच 'नाच रे मोरा' आजही टवटवीत वाटतं, 'बाई या पावसानं' पुन्हा पुन्हा ऎकावंसं वाटतं, आणि पुलंची हार्मोनियम उत्स्फूर्तपणे म्हणायला लावते, 'क्या बात है!' पण आता उरल्या आहेत फक्त कॅसेटमधल्या बंद आठवणी! पण आजही त्या ऎकताना क्षणभर का होईना पु. ल. आपल्यात असल्याची जाणीव करुन देतात. पु. लं.च्या बहुरुपी व्यक्तिमत्वाचा हा आणखी एक पैलू!
अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित