आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
आभार

श्री. शशीकांत गानू, श्री. मनोहर काळे ( लोकमान्य सेवा संघ, पार्ले )
कै. श्री. मधू गानू (पुणे)
वेळोवेळी पत्र, फोन, ई-मेल द्वारे शुभेच्छा-अभिप्राय देणारे असंख्य पु. ल. प्रेमी
अनेक छोट्या-मोठ्या कामात नेहमीच हक्काने मदत करणारी अनेक पुलकित मित्रमंडळी!

या सगळ्यांनाच आभाराची गरज नाही ! पण या सगळ्यांनीच वेळोवेळी आपुलकीने केलेल्या मदतीमुळे
हे संकेतस्थळ गेली १० वर्षे सुरु ठेवणे शक्य झाले, हे सांगताना खूप अभिमान वाटतो आहे.

स्मिता मनोहर
admin@puladeshpande.net


अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित