पु. ल. गौरव दालन · Categories
कौटुंबिक पु.ल. / साहित्यिक पु.ल. / साहित्यसंमेलनाध्यक्ष पु.ल. / छायाचित्रकार पु.ल. / नाट्यसंमेलनाध्यक्ष पु.ल. / काव्यधर्मी पु.ल. / समाजकृतज्ञ पु.ल. / समानधर्मी पु.ल. / चित्रपटसृष्टीत पु.ल. / संवादिनीकार पु.ल. / मानसन्मान / चित्रनायक पु.ल. / आकाशवाणी, दूरदर्शनवर / दिग्दर्शक पु.ल. / बहुरुपी पु.ल. / नाटककार पु.ल. / व्यंगचित्रकारांचे पु.ल. / निर्भीड पु.ल. / असे साकार झाले "पु. ल." गौरव संग्रहालय /
( 'लोकमान्य सेवा संघा'चे मानद वास्तुशास्त्रज्ञ श्री. प्रवीण कणेकर यांनी संग्रहालयाचा आराखडा तयार केला. तो कसा साकार झाला हे त्यांच्याच शब्दात...)

पु.ल. त्यांना मिळालेली, त्यांनी मिळवलेली गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे, त्यांची आजपर्यंतची असंख्य छायाचित्रे - त्याचे संग्रहालय तेही काम रूपाने. 'लोकमान्य सेवा संघा'चा मानद वास्तुशास्त्रज्ञ म्हणून या विषयावर चर्चा करण्याकरिता संस्थेचे उत्साही कार्यवाह श्री. गानू आणि ज्येष्ठ पदाधिकारी जेव्हा मला भेटले तेव्हाची आनंदाने पुलकित झालो. त्याच वेळी एवढ्या प्रचंड व्यक्तीमत्वाची तितकीच दैदीप्यमान कारकीर्द ४०' X ४०' आकाराच्या डाॅ. टिळक सभागृहात आटोपशीरपणे मांडावयाची म्हणजे एक फार मोठे आव्हान आहे याचीही जाणीव झाली.
सर्वात प्रथम, आर्किटेक्ट हा नात्याने पदाधिकार्यांच्या मनातील विचार जाणून घेणे, त्यांच्या कल्पना समजून घेणे आणि त्यांच्या मूळ कल्पनांना बगल न देता, त्यांच्या उत्साहाला आवर घालीत एक छानशी 'वस्तू' किंवा 'वास्तू' उभी करणे अत्यावश्यक असते. येथे मूळ कल्पना कशी होती? खूपच बाळबोध... पुल्ना मिळालेल पुरस्कार काढेच्या कपाटात ठेवणे आणि उपलब्ध असलेल्या फोटोंच्या तसबिरी भिंतीवर लावणे. हे सर्व करीत असताना कमी खर्च हे घोषवाक्य ! मी एवढेच म्हणालो, " तुमच्या कल्पना समजल्या, मला फक्त दोन दिवस द्या. आम्ही आर्किटेक्ट कागद आणि पेन्सिल हा माध्यमाद्वारे बोलतो. तेव्हा मी कच्चा आराखडा तयार करतो आणि मगच आपण पुढे बोलू. "
पदाधिकार्यांशी बोलताना मला एक मात्र जाणवले ते म्हणजे पुलविषयी एक प्रचंड आत्मियता आणि सर्व धरतीत, सर्व क्षेत्रांत, सर्व प्रांतात लोक हे प्रदर्शन बघावयास येणार याची त्यांना असलेली जाणीव.
मी आणि माझे सहकारी कामाला लागलो. खर्चाच्या हिशोबात काम छोटे होते पण कामाचा आवारा मोठा होता आणि ज्या व्यक्तीकरिता हे सारे करायचे होते ती व्यक्ती तसेच ज्या संस्थेकरिता करायचे होती संस्था - दोन्ही खूपच महान !
निवडण्य़ात आलेली जागा त्यामानाने खूपच लहान. तसेच पुल्ची कार्यक्षेत्र अनेकविध !

प्रथमदर्शनी प्रवेश करताना पु.ल. त्यांच्या परिचित स्थावरिसिंह. डावीकडे पुर्ल्या हस्ताक्षरातील संदेश. लोकमान्य सेवा संघाच्या त्रिमूर्तीसमवेत.
क्र. १. कौटुंबिक पुल, २. साहित्यिक पुल, ३. साहित्यसंमेलनाध्यक्ष, नाट्यसंमेलनाध्यक्ष पुल, ४. छायाचित्रकार पुल, ५. काव्यधर्मी पुल, ६. समानधर्मी पुल, ७. पेटिवार्दक पुल, ८. मानसम्मान, ९. रजतसुष्टीतील पुल, १०. बहुरूपी पुल, ११. नाटककार पुल, १२. व्यंगचित्रकारांच्या नजरेतून. १३. वरील भागांत चारी बाजूंना : पुर्ल्या अनेकविध भावमुद्रा
प्रत्येक क्षेत्रात त्यांचे अपवाट कर्तृत्व. हा सर्व कार्यक्षेत्रांना न्याय देणे आवश्यक. हा सर्व विचार करून आम्ही उपलब्ध असलेल्या केवळ चार भिंतींचा वापर न करता त्या चार भिंतीमध्ये अनेक भिंती तयार केल्या. प्रत्येक क्षेत्राला वेगळे दालन मिळेल हाची काळजी घेतली. तयार झालेल्या दालनाची योग्य आकारात (तीन) विभागणी केली.
१. सर्वात खालील भाग बंद कप्प्यांचा केला. जेथे पुल्ची हस्तलिखिते, त्यांची विविध पुस्तके, पुस्तकावर लिहिल्यात आलेल्या समीक्षा आणि असंख्य कागदपत्रे, जी भविष्यकाळात संदर्भासाठी वापरण्यात येतील.
२. मधला भाग काचेच्या आवरणांनी झाकून त्यामध्ये पुलंना मिळालेले पुरस्कार आणि भेटवस्तू ठेवण्याची योजना आखली आणि
३. वरील भाग छायाचित्रे लावण्याकरिता.
आराखडा तयार होत असताना तेथे ठेवण्यात येणाऱ्या वस्तू आणि असंख्य छायाचित्रे यांची पाहणी करणे आवश्यक होते. हाकरिता पु.ल. आणि सौ. सुनीता-विहिनी हांचेबरोबर गाठीभेटी झाल्या. त्यांबरोबर त्यांच्याशी आराखडयाबाबत चर्चा करून बहुमोल मार्गदर्शन घेण्यात आले.
आराखडे तयार होत होते. विविध आराखड्यांमधून अंतिम आराखडयाचे स्वरूप ठरले. तत्पूर्वी एकूण कल्पना यावी म्हणून यथार्थ दर्शन वास्तुचित्र (perspective sketch) दाखविण्यात आले. योजना पसंत पडली. काटकसर हा दृष्टीने निरनिराळे साहित्य कसे वापरता येईल याची कल्पना देण्यात आली. बारीकसारीक तपशील, डिझाईन करीत असताना एक भान कायम ठेवावे लागत होते. तयार होणारी 'घोळ' बोडक वाटता कामा नये. मात्र ते आकर्षक दिसेल, लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना ते भावणे तितकेच महत्त्वाचे होते. तसेच संग्रहालयाच्या मूळ कल्पनेला तडा जाता कामा नये. हाकरिता फॉल्स-सिलिंग, रंगसंगती, प्रकाशयोजना, क्वायलरच्या गालिचा आणि तसेच मध्ये एखादा 'डेकोरेटिव्ह प्लॅन्ट' यावर विचारपूर्वक लक्ष देण्यात आले.
प्रथमदर्शनी प्रवेश करताना पु.ल. त्यांच्या परिचित स्थावरिसिंह. डावीकडे पुलंच्या हस्ताक्षरातील संदेश. लोकमान्य सेवा संघाच्या त्रिमूर्तीसमवेत.
क्र. १. कौटुंबिक पुल, २. साहित्यिक पुल, ३. साहित्यसंमेलनाध्यक्ष, नाट्यसंमेलनाध्यक्ष पुल, ४. छायाचित्रकार पुल, ५. काव्यधर्मी पुल, ६. समानधर्मी पुल, ७. पेटिवार्दक पुल, ८. मानसम्मान, ९. रजतसुष्टीतील पुल, १०. बहुरूपी पुल, ११. नाटककार पुल, १२. व्यंगचित्रकारांच्या नजरेतून. १३. वरील भागांत चारी बाजूंना : पुलंच्या अनेकविध भावमुद्रा
आराखडयाबरोबरच दालन उभे राहिली आणि येथे आगमन झाले श्री. अरुण आठल्ये यांचे. पुलंचे असीम चाहते. संग्रहालय हा क्षेत्राविषयी भरपूर अनुभव. त्यांचे संग्रहालय उभारणीसंबंधी मार्गदर्शन आणि योगदान अपूर्व असेच होते. येथील छायाचित्रांची सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि छायाचित्रकला आज किती प्रगल्भ अवस्थेत गेली आहे, हाची सर्वाना ओळख करून दिली. फोटो तयार झाले. त्यांची दालने नवक्या झाली. पण योग्य प्रकारे त्यांची रचना होणे आवश्यक असते. फोटो बघत असताना बघणाऱ्याला कंटाळा न येता शोभेपर्यंत उत्साह राहिला पाहिजे आणि येथे अवतरले साक्षार्थ श्री सत्यनारायण, फार मोठे लेआउट आर्टिस्ट. फोटोंची मांडणी, त्यांची रचना हे सर्व कसब श्री. सत्यनारायणजींचे. हे सर्व करीत असताना लोकमान्य सेवा संध्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांच्यामुळे कामाला एक आगळेवेगळे स्वरूप आले होते.
आज हे संग्रहालय "पु. ल. गौरव दर्शन" ह्या नावाने दिमाखात उभे आहे. चोखंदळांनी त्याची वाखाणणी केली आहे आणि आता १९ डिसेंबर पासून ते आम जनतेसाठी खुले करण्यात येत आहे. सभागृहात शिरणारी प्रत्येक व्यक्ति काही काल 'पुलमय' होणार आहे. कोणी वरातीत फिरून येतील तर कोणी बटाट्याच्या चाळीत रमून जातील. लहान-तरुणांना दिसतील एक अफाट पु. ल.
माझ्यापुरते सांगायचे झाल्यास हा एक 'अनुभव' होता कायम संग्रही ठेवण्यासारखा. हे काम करीत असताना पु. ल. आणि सौ. सुनीतावहीनी ह्या दोन महान व्यक्तींचा प्रत्यक्ष सहवास लाभला, धन्य झालो.
- प्रवीण कणेकर
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.