|
|
|
|
माझे लिखाण हे मुख्यत: एक परिहासविजल्पित आहे. त्याचे साहित्यिक मूल्य काय आहे, ते कालबाह्य होते आहे की काय, या गोष्टींची मी फारशी चिंता केली नाही. जीवनातल्या निरनिराळया क्षेत्रांत मी वावरलो. माणसांच्या वागण्या-बोलण्यांत अनेक विसंगती अनुभवल्या. त्या मनावर टिपल्या गेल्या. त्यातून हे लेखन घडले. ते ग्रंथांतून वाचतांना, ध्वनिफितींवर ऐकताना वाचकांनी आणि श्रोत्यांनी मनापासून हसल्याची मला वेळोवेळी पावती दिली. त्याने मी भरुन पावलो. त्या पावत्यांमुळे विनोदी लिहिण्या-बोलण्याची माझी जित्याची खोड आजवर टिकून राहिली. ती टिकवून ठेवणारे रसिक मित्र भेटले आणि साऱ्या आयुष्याचीच एक आनंददायी मैफिल झाली. |
|
|
|