आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
छोट्यांसाठी पु.ल.
अभ्यास: एक छंद !
वारणानगरीतले बालकिन्नर
विद्यार्थ्यांशी हितगुज
... सुसज्ज रंगमंचावर रांगेत उभे राहून गायन मास्तरच्या इशाऱ्या बरोबर गाणारी मुलं मुली छान दिसतात. पण तसला गाण्यांचा कार्यक्रम मला करायचा नव्हता. तहानभूक विसरुन नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या पोरांचा ताफा घेऊन मला गायचं होतं. त्या हॅमिलनच्या पिपाणीवाल्यासारखं. एखाद्या खेडयात जावं आणि पिंपळाच्या पारावर हातातली दिमडी वाजवीत पोरांची गाणी सुरु करावी. भरभर पाखरांसारखी पोरं जमली असती. फाटकया तुटकया कपडयातली, शेंबडी, काळीबेंद्री. पण एकदा मनसोक्त गायला लागल्यावर तीच पोरं काय सुंदर दिसली असती. आणि त्याहूनही रंगीबेरंगी कपडे घालून गावोगाव हिंडत त्यांच्यात नाचणारा आणि गाणारा मी अंतर्बाह्य सुंदर होऊन गेलो असतो. वारणानगरीतील बाल किन्नरांना पेटी ऐकवतांना

... माझ्या पेटीवादनाची प्रत काहीही असो पण माझ्याआयुष्यात इतक्या बालस्वरांतून जागेजागेला अशी दाद यापूर्वी मला कधीच मिळाली नव्हती.
पावसाची रिमझिम थांबली रे,
तुझी माझी जोडी जमली रे ...

व्यक्तिव्यक्तिगणिक आवड निवड बदलत जात असते. साहिजकच दर पिढीगणीक आवडी निवडी,अभिरुचींचे मानदंड बदलतात. संदर्भ कितीही बदलले,पिढ्या बदलल्या तरी काही गोष्टी मात्र आपला प्रभाव पिढ्यान पिढ्या टिकवून असतात. पाच दशके होत आली तरी प्रत्येक मराठी घरातील मूलआजही सूर आणि लयीशी परिचित होतं, ते 'नाच रे मोरा' च्या ठेक्यावरच. म्हणूनच अनेक दशकांनंतरही टवटवीत राहिलेल्या आणि अजरामर झालेल्या अगदी थोड्या गाण्यांमध्ये 'नाच रे मोरा' चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. बालसुलभ मनाला भुरळ पाडणाऱ्या ह्या गाण्याची चाल होती, पुलंची! मुलांची नस अचूक पकडण्याचं पुलंचं कसब हेच यामागचं रहस्य म्हणता येईल.
पुलंनी खास छोटयांसाठी लिहिलेल्या एकांकिका...मराठी रंगभूमीवर यशस्वी ठरलेल्या अनेक कलावंतांनी त्यांच्या लहानपणी या नाटकांमधून भूमिका करुन रंगभूमीवर पदार्पण केलं, पु. ल. म्हणतात याचं मला फार समाधान वाटतं.


अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित