आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
अजरामर पु.ल.
एक झुंज वाऱ्याशी
गांधीजी
पु.लं.च्या काही निवडक, वैविध्यपूर्ण कलाकृती... या कलाकृतींची ओळख जुन्या व आताच्या पिढीतील पु.ल.प्रेमींना आहेच, पण नवीन पिढीलाही त्यांची ओळख व्हावी हा मुख्य हेतू. पु.लं.चे सगळेच साहित्य हे केवळ ठराविक काळ, समाज व्यवस्था व संस्कृती पुरते मर्यादित नव्हते, तर आताच्या व येणाऱ्या काळातही त्याचे संदर्भ लागू पडतात. अशा काही अजरामर कलाकृतींची ओळख किंवा पुन्हा नव्याने आठवण करुन देण्याचा हा प्रयत्न.. हेतू हाच की रसिक पु.ल.प्रेमी मूळ साहित्य विकत घेतील, मिळवतील, नव्याने अनुभवतील व नवीन पिढीपर्यंत पोहोचवतील...
अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित